-ती वाट-
विचारांचे गाठोडे खांद्यावर घेऊन
चोखंदळपणे निवडेली ती वाट
समूद्रासारखी क्षितीजापलीकडे
अशी अनंतात जाणारी अथांग वाट.
जीवनाच्या वाटेवरचे एक वळण
ज्याने वावटळीत भूलवले मनाला
ते निर्दयी वळण तर सुटले मागे
पण करून गेले नैक जखमा हृदयाला
त्याच वाटेवर दूर कुणी दिसली
आणि सोबतीची आशा फुलली
पण ती मृगजळातील प्रतिबींब होती
जीने माझ्या हाकेला हाक दिली
आता चाललो आहे एकटाच
या उनाड माळरानावर
पण अजूनही वाट पाहतो तीची
कारण विश्वास आहे माझा प्रेमावर
Gr8 words..keep writting
ReplyDelete