Saturday, April 17, 2010

-Ek Kshan-


कधीकधी मनमोहक प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, आणि कोय्रा जीवनाला
अर्थपूर्ण वळण देतात.
या क्षणांना नैकविध रंगांच्या छटा असतात,
आणि छटांच्या सौंदर्याला भावनांच्या झालरी झळाळतात.

कधी त्या क्षणांमध्ये प्रेयसीचा सुंदर सहवास असतो,
आणि त्या सहवासालापण शांत झुळूकेचा स्पर्श लाभतो.
या नाजूक समयी चंचल नजरेमध्ये फक्त ती स्थिरावते,
जेव्हां तीच्या कोमल हातात हात आणि मनात प्रेम बळावते.

कधी या क्षणांना आईच्या मायेचा स्पर्श असतो,
पण या मायेत लहानपणीच्या धम्मकलाडूंचा प्रसादही आठवतो.
कधी आईने बनवलेल्या पक्वांन्नाची चव जीभेवर रेंगाळते,
आणि तीने सांगीतलेल्या गोष्टींमध्ये बालपण पुन्हा भेट देते.

कधी सर्व मित्रांसोबत घालवलेला वेळ असतो,
पण तो गेलेला वेळही जन्मभर आपल्या सोबत असतो.
या वेळेत सर्वांनी मिळून केलेली हुल्लडबाजी असते,
तर कधी निर्भेळ हास्य आणि मित्राची काढलेली खोडी असते.

अशा या क्षणाक्षणांनीच जीवन बनते,
पण या क्षणभंगूर क्षणांशिवाय हे जीवन व्यर्थ असते.
जीवनाच्या आठवणी आपल्या स्मरणात राहतात,
आणि मन खिन्न असताना हेच क्षण दुःख विसरवतात.

-Omkar

No comments:

Post a Comment